वास्तुकंस्लटींग - चिंतन, मनन आणि प्रतिभा यांची सांगड
- Ashish Karekar
- Jan 16, 2022
- 1 min read
Updated: Jun 11, 2024

वास्तु कन्स्लटिंग करणं म्हणजे, वास्तु आणि इमारतींचे एक प्राचीन भारतीय शास्त्र निसर्गाच्या नियमांनुसार वैज्ञानिक मार्गाने पंचतत्त्व आणि ऊर्जाक्षेत्र यांचा समतोल राखून तेथील रहिवाश्यांना राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी अनुकूल, सुसह्य बनवण.
जेव्हा आपण कुठलीही वास्तु कन्स्लटिंग करतो तेव्हा तेथील रहिवाशांना त्या वास्तुचे जे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम भोगावे लागत आहेत त्यांचे स्वरूप त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यालाच Symptoms matching असंही म्हणतात. त्यावरून वास्तुमूळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता आपल्याला योग्यरित्या लक्षात येते. म्हणजेच किती प्रमाणात दिशा, तत्व बिघडलेली आहेत त्याचे अवलोकन करता येते. रहिवाशांच्या प्रश्नांची गहनता लक्षात येते. काही गोष्टी खरंच आहेत किंवा लपवल्या जात आहेत कि भासवल्या जात आहेत याचीसुद्धा कल्पना येते. एकदा का आपण त्यावास्तुची नाडी पकडली कि वास्तु विसंगतीचे मूळ उलगडू लागते.
जिथे आपण वास्तु कन्स्लटिंग करतो तिथे काही पथ्य पाळणं आणि स्वतःला नियम घालून घेणं गरजेचं असत. त्या वास्तुमधील ऊर्जेशी एक विश्लेषणात्मक नातं जोडावं लागत. वास्तु-कन्स्लटंट म्हणूनच वास्तुमध्ये अन्नग्रहण किंवा पाणीग्रहण वर्ज्य करतात. वास्तु कन्स्लटिंग करताना वास्तुशी एकरूप होणं गरजेचं असत पण तेथील कुठल्याच तत्वाशी आणि घटकांशी नामानिराळ राहणंहि तेवढच महत्वाच असत.
सर्वात महत्वाच म्हणजे वास्तु कन्स्लटंटने नेहमी अध्यात्मिक साधना, उपासना आणि गुरुकृपेत पात्र असाव. जेवढी आत्मिकशक्ती आणि ध्यानशक्ती पक्की तेवढे तुमचे अंतर्ज्ञान आणि तिसऱ्या शक्तीला ओळखण्याची कृप्ती जास्त. वास्तुमध्ये असलेले वास्तुदोष ओळखून त्यावर योग्य त्या रेमेडीज करून रहिवाशांना सुख, शांती चांगले आरोग्य आणि मनःशांती प्राप्त करून देणं हेच वास्तु कन्स्लटंटचे ध्येय असावं.
वास्तुशास्त्रावर चिंतन, मनन आणि प्रतिभा यांची सांगड, हेच वास्तु कॅन्सल्टंटचे मूल्यामापन आणि निरीक्षणकौशल्य ठरवते.
Comments