शिवलिंग, पंचतत्त्व आणि वास्तु
- Ashish Karekar
- Jan 16, 2022
- 1 min read
Updated: Jun 11, 2024

शिवलिंग, पंचतत्त्व आणि वास्तु
भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंग म्हणजे पिंडी, जिथे पंचतत्त्व आकर्षित करण्याचे प्रचंड बळ असते.
उत्तराखंडचे केदारनाथ तेलंगणाचे काळेश्वरम, आंध्रप्रदेशचे कालहस्ती, तमिळनाडूचे एकंबरेश्वर, चिदंबरम आणि रामेश्वरम मंदिरांची शिवलिंग पंचतत्वाची प्रतिनिधित्व करतात आणि भौगोलिक रूपातही या मंदिराची विशेषता आहे.
श्रीकालहस्ती मंदिरातील दीप वायूतत्व, तिरुवनिक्का मंदिरातील पाणीसाठा जलतत्व, आण्णा मलाई पहाडी वरील विशाल दिवा अग्नितत्व, कांचीपुरम मंदिरातील वाळूचे स्वयंभू लिंग पृथ्वीतत्व आणि चिदंबरम मंदिरातील निरकारता आकाशतत्व दर्शविते.
महाकालेश्वर (उज्जैन) पासून हि सर्व ज्योतिर्लिंग एक विशेष भौगोलिक संबंध जोडून आहेत.
तुमच्या वास्तुत जर वास्तुदोष असेल तर तुम्ही ज्योतिर्लिंगांची उपासना, साधना आणि लिंगभिषेक करून तिथे एकवटलेल्ले पंचतात्विक बळ स्वतःमध्ये असलेल्या पंचतत्वांशी सकारात्मक करून आपल्या जीवनात त्याचे शुभ परिणाम पाहू शकता.
Comments